माझ्या मते विनायक यांनी लिहिलेल्या प्रतिसादास डिस्क्लेमर आवश्यक आहे. त्यातून त्यांना लोकांच्या भावना दुखवावयाच्या नाहीत हे कळून येते. व त्यातूनच त्यांचे खरे "मनोगत" कळते. अन्यथा तो "उर्मटपणा / लोकांच्या भावनांबद्दल बेफिकीरपणा" वाटेल.
मनोगत म्हणजे "मनास येईल तसे" किंवा "वाट्टेल ते" असे समजून लोक लिहावयास लागले तर अवघड होईल. प्रत्येकानेच अगदी "तोलून मापून" नाही, तरी निदान "जपून" तरी बोलावेच. कारण शब्द हे शस्त्र आहे.
"नेहेमी सत्य बोलावे, परंतु विनाकारण कटू सत्य बोलू नये" खरेच त्या कटू बोलण्याने सर्वांचा फायदा होणार असेल तरच बोलावे.
(भावूक आणि परखड) अमित चितळे