मृदु,
तुझ्या शंका बरोबर आहेत. मी लिहीलेली पाककृती परत वाचल्यावर मलाही याच शंका आल्या.
चौकोनी घडी:
आपण पोळीची नेहमी घडी करतो ती पोळी व्यासावर(डायमीटरवर)घडी घालून आणि त्या घडीची परत मध्यात घडी घालून. त्यामुळे होणारा प्रकार हा 'चतकोर' किंवा 'केंद्रीय कोन ९० अंश असलेली वर्तुळपाकळी(सेक्टर)' असतो. तो तसा न होता चौकोन बनण्यासाठी पोळीच्या चार कडा पोळीच्या मध्यबिंदूवर आणून दुमडाव्या. आता आपल्याकडे चार गोल पृष्ठभाग दुमडून बनलेला चौकोन असेल.
'चौकोन' पाहिजेच असे काही नाही. मूळ फंडा घड्यांच्या आत तुपाचा हात लावून थर भाजताना थोडे वेगळे व्हावे, पण त्याबरोबरच हा वेगळे थरवाला प्रकार फुगू नये(नाहीतर तो 'क्रिस्प' लागणार नाही) हा एकमेव हेतू घड्या करुन त्यात तुपाचा हात लावण्यामागे. बाकी घड्या त्रिकोणी कर, चौकोनी कर, पंचकोनी कर, काही फरक नाही. ('गोल' आणि 'चौकोन' जास्त 'प्रेझेंटेबल' वाटतील.)    
झाकण ठेउन रुमालाने दाबणे:
मला खूप हसू आलं हे वाचून. पण मी लिहीलंच तसं आहे. पहिल्यांदा रुमालाने दाबणे क्रियेने बट्टीचे फुगणे बंद केले आणि उलटून जर ती परत बंड करुन फुगायला बघत असेल तर परत दाबावे. फुगत नसेल तर झाकण ठेउन थोडावेळ भाजू द्यावी. बट्टी खूप जाड नसेल तर ती झाकण न ठेवताही नीट भाजली जाईल, झाकण ठेवणे बर्‍यापैकी ऑप्शनल आहे. नीट भाजली जाणे याचे फक्त भान ठेवावे.   
आपली(पाल्हाळीक)अनु