कथा सुंदर आहे.

मला तरी राजारामाची काही चूक दिसत नाही. जनावर बोलू शकत नसल्यामुळे त्याच्या प्रत्येक कृतीचा आपण लावू तसा अर्थ निघतो. जो पर्यंत सुलताना त्याच्याशी प्रेमाने वागत होती तो पर्यंत राजारामाने असा आततायी विचार केला नाही. तसेच, सुलताना बेसावध असताना, झोपली असताना राजारामाने तिच्यावर हल्ला करून तिला मारले नाही. तिने अंगावर झेप घेतली असता राजारामाने स्वसंरक्षणार्थ हत्यार चालवले. तिची झेप 'वाचण्यात' राजारामाची चूक झाली असेल पण त्याने तो 'निष्ठुर' ठरत नाही.

लेखनशैली उत्कृष्ट आहे. अभिनंदन.