अमित
विषय छानच आहे. इंग्रज भारतातून का गेले ह्या प्रश्नाला एक सर्वसमावेशक असं उत्तर मिळणं कठीण आहे. शिवाय आपण जित होतो, त्यामुळे इंग्रजी साम्राज्याचा अंत हा आपल्या स्वातंत्र्यलढ्यामुळे झाला असा समज करून घेण्यात आपण नेहमीच पुढे असतो. मग आपण गांधीवादी असू वा सावरकर/ सुभाषवादी. पण इंग्रजांच्या साम्राज्याचा अस्त हा बहुतांशी भारताशी संबंध नसलेल्या कारणांमुळे झाला असं आढळतं. कोणत्याही साम्राज्याचा "अंत" हा अटळ असतो, आणि त्या अस्ताच्या कारणातील बरीचशी कारणं ही त्या साम्राज्याच्या अधिपतींच्या धोरणांमध्ये असतात. मानवी समाजाच्या इतर कोणत्याही अंगापेक्षा आर्थिक अंग हे शेवटी त्या समाजाच्या उन्नतीस/ र्हासास कारणूभूत ठरते. मला ह्या विषयावर खरंच विस्ताराने लिहायला आवडेल. आज रात्री जमलं तर लिहीन.
पण परत एकदा खूपच छान विषय चर्चेला आणल्याबद्दल अभिनंदन.
सर्व मनोगतींना एक विनंती.. जमलं तर नेहमीच्या "गांधी/ गांधीविरोधी" साच्यातून बाहेर पडून, जरा वेगळ्या अंगाने/ ढंगाने ह्या विषयावर चर्चा करू या का?