या निमित्ताने एक चांगला मुद्दा पुढे आला आहे. पोलिस त्यांनी करायची कामे न करता उगीच नको तिथे लक्ष घालतात. त्यातूनच अतिरेक्यांना असे स्फोट घडवून आणायची हिम्मत मिळत असते.

मला पोलिसांचे खच्चीकरण करायचे नाही. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात काही अवैध धंदे करणारया व्यावसायिकांना एका तोतया पोलिसाने कित्येक हजारांचा गंडा घातला. एका सूज्ञ(!) व्यावसायिकाला संशय आला आणि त्या तोतया पोलिसाला गजाआड करण्यात आले. पण यातून त्या पोलिस ठाण्यातील पोलिसांचा भ्रष्टाचार सरळ सरळ उघडकीस येतो.

यातून घातपात्यांना मोकाट रान मिळत असते,प्रोत्साहन मिळत असते. तेंव्हा पोलिसांनी आपले वर्तन हे त्यांच्या खात्यास भूषणावह ठेवावे. अन्यथा याचे परिणाम सामान्य माणसास पर्यायाने पोलिसांनासुद्धा भोगावे लागतील यात शंका नसावी.

अ.मो.दातार.