कथानकात नाट्य आहे.

प्रेमात पडलेल्या मिता सारख्या अनेकांना विरोधी मतप्रदर्शन, प्रतिकूल सल्ले रुचत नाहीत. त्यामुळे परिस्थितीत काही फरक पडला असता असे वाटत नाही.

कथेची हिंदू-मुस्लिम पार्श्वभूमी कथेला वेगळे आणि नायिकेला सहानुभूती अर्पिणारे अन्यायी वळण घेते. 'तलाक'च्या निर्णयाआधी घडलेले अनेक प्रसंग अंधारात राहतात. त्यामुळे फक्त मिताची कहाणी, तिही तिच्याच तोंडून, ऐकून मतप्रदर्शन करणे चुकीचे होईल.

'सल' ह्या तीव्र आणि तीक्ष्ण भावनेचे शब्दचित्र रेखाटताना मिताला समजविण्याचे, विनाशकारी घटनांना टाळण्यासाठीचे प्रयत्न (कोणत्याही कारणाने) तितके प्रकर्षाने जाणवत नाहीत. 'तिच्या नशिबात असेल ते घडणारच, आपण काय करू शकतो' ही असाहाय्यता आणि लिखाणातून दिसून येणारा, विनाशाचा अस्पष्ट स्वीकार, 'सल' शीर्षकाला बोथट बनवितो.

परंतु, सुसंबद्ध लिखाण आणि वाचकाला खिळवून ठेवण्याचे कौशल्य प्रकर्षाने जाणवते.

अभिनंदन.