हा इतिहास खूपच व्यवस्थित कागदोपत्री नोंदलेला आहे. ( अर्थात्तच ब्रिटिशांची बाजू )

वाचा 'transfer of power'  ( प्रचंड आहे ),  त्याशिवाय तिकडच्या पार्लमेंट्मधील भारतविषयक चर्चांचे खंड पण मी एकदा दिल्लीत चाळले होते. कदाचित मोठ्या ग्रंथालयात असतील इतर ठिकाणीही.

भारतासारख्या अवाढव्य देशाचे व्यवस्थापन, त्यासाठी खर्च होणारी शक्ती आणि त्यातुन होणारा तुलनात्मक फायदा याचे गणित जुळेनासे झाल्याने इंग्रज गेले. याबद्दल अत्यंत विस्तृत चर्चा ब्रिटिश पार्लमेंट्मध्ये प्रदीर्घ काळ चालू होती. ( अशाच एका भाषणात चर्चिलने, 'आपण भारतातुन गेलो तर कॉन्ग्रेसचे भ्रष्ट पुढारी सत्ता ताब्यात घेतील आणि जनतेचे शोषण करून स्वत:च्या तुंबड्या भरतील ' असे म्हणून ठेवले आहे. )

'चले जाव' वा तत्सम आंदोलनांचा तुमच्या भारत सोडण्याच्या निर्णयाशी काही संबंध होता का असे किप्सला  मुलाखतीत विचारले तेंव्हा 'very little ' असे उत्तर त्याने दिले.

नंतर ( कोणत्याही विशेष स्वातंत्र्यचळवळी शिवाय ) इंग्रज सिंगापूरमधूनही निघून गेले. आणि जेंव्हा सिंगपूरच्या नव्या सरकारने त्यांना ( सर्व व्यवस्था नीट लागेपर्यंत ) आणखी काही काळ राहण्याची विनंती केली, तेंव्हाही त्यांनी बदलत्या प्रायॉरिटीजमुळे परवडत नाही असेच सांगितले पण मग बरीच घासाघीस करून ते काही काळ अजून थांबायला तयार झाले.

असे बरेच काही आहे या विषयाबद्दल आणि इथे चर्चिल्या जाणार्‍या इतरही अनेक विषयांबद्दल ( गांधी, मुसलमान ई. ई. ) पण इथे सर्व लिहीणेही वेळेअभावी ( आणि माझ्या लिहिण्याच्या मंद गतीमुळे ) शक्य नाही. 

पण अशा सर्व चर्चा वाचल्यामुळे एक नम्र सुचना करू इच्छितो , ' अभ्यासाचा अभाव अभिनिवेशाने भरून काढता येत नाही. काही जण स्वत: काही अभ्यास न करता उगाच आडवे तिडवे प्रश्न विचारतांना दिसतात, किंवा सरसकट विधाने करतांना दिसतात. हे टाळल्यास चर्चेचा दर्जा राखला जाईल'