आपल्याकडे असे म्हटले जाते की काम करणाऱ्याकडूनच चुका होतात,तेच म्हणणे पुढे नेल्यास जो आधार देतो त्याचेच दोष दिसतात.इतर प्रांतात खायला मिळत नाही म्हणून महाराष्ट्रात यायचे आणि वर मराठी माणसालाच शिव्या द्यायच्या आणि शहाणपण शिकवायचे हा कुठला न्याय निरनिराळ्या कारणावरून  गुजरात,कर्नाटक कोलकत्ता इ.ठिकाणी लोक कसे वागतात ते पाहिल्यावर आपण परप्रांतीयांशी फारच सौहार्दाने वागतो असे वाटते‌  साधी गोष्ट,गुजरातमध्ये एका शिबिराला गेल्यावर तेथे सर्व वक्ते आपल्या भाषणात गुजरातीचाच वापर जास्त करणार,त्याना शेवटी सांगावे लागले की येथे इतरभाषिक पण आहेत.आपण बहुधा परप्रातीय आपल्या समुदायात असेल तर त्याला कळावे म्हणून हिंदीत बोलतो.मी कर्नाटक  प्राध्यापकांच्या समुदायात असलो तरी ते सर्व कानडी भाषेतच बोलणार. चेन्नाईला आपण गेलो तर आपल्याशी हिंदीत बोलणार नाहीत,एकाद्याला इंग्रजी येत नसेल तर त्याची परिस्थिती फार वाईट करतात,आणि हे सर्व जाणून बुजुन असते हे विशेष!महाराष्ट्राच्या निरनिराळ्या शासकीय सेवांमध्ये जेवढे परप्रांतीय आढळतात तेवढे कोठेच सापडणार नाहीत. अशा लोकानी प्रथम स्वतःचे परीक्षण करून मग महाराष्ट्र आणि मराठी माणसाविषयी बोलावे हे योग्य.