क्रमांक एक - या चर्चेच्या प्रस्तावाचे प्रयोजन कळाले नाही.
क्रमांक दोन- पण नुसते, "जपा", "काळजी घ्या" वगैरे दिलेले सल्ले वाचून उद्विग्नता आली
मुंबईबाहेर रहाणारे दुसरे काय करू शकतात सांगा. ज्यांच्याशी मैत्री वगैरे तर सोडाच, पण ज्यांना कधी भेटलोही नाही, ज्यांना कधी पाहिलेलेही नाही अशा लोकांविषयी मनापासून वाटणारी काळजी याचे महत्त्व तुमच्या दृष्ट्या काहीही नाही?
क्रमांक तीन - मी परत मनोगतावर काही लिहीन असे वाटत नाही. मी ज्ञानी आणि बाकी सर्व अज्ञानी असे समजत नाही, तरीही, राहून राहून वाटते, की आपल्या मराठी लोकांमध्ये खूप अज्ञान आहे. आणि खूप भेकडपणा आहे. अगदी वेगळया नावांआडून लिहिताना देखील.
हा त्रागा कशासाठी? अहो, जर इतके अज्ञान, इतका भेकडपणा आहे असे तुम्हाला वाटते, तर इथे राहूनच तो दूर करण्याचा प्रयत्न करा की. मी इथे पूर्वी लिहील्याप्रमाणे 'यू हॅव टु बी अ पार्ट ऑफ दी सिटीम टू इम्प्रूव्ह इट'
क्रमांक चार - गंभीर विषयाला उत्तरे देतानाही कंपूबाजी, काही लिखाणाकडे दुर्लक्ष करणे, आणि प्रसंगी बालीशपणा याचे सारखे नमुने बघायला मिळतायत. अर्थात हा दोष फक्त मनोगतावरच्या मराठी माणसाचा नाही, तो आपल्याला घडवणाऱ्या सर्वच समाजाचा आहे. तेव्हा जास्त काही बोलण्यात अर्थ नाही.
अहो, हे फक्त 'मनोगत' वरच आहे असे नाही. समाजात सगळीकडेच हे आहे. हे कमी कसे करता येईल याविषयी काही सकारात्मक बोला की.
आणि शेवटी...
'मनोगत' वरचा वावर हा काही विद्यापीठाने लावलेला सक्तीचा पेपर नाही. हा ज्याच्या त्याच्या खुषीचा मामला आहे. माझे वैयक्तिक मत विचाराल तर असंख्य मतभेद आणि भांडणे असूनही मला 'मनोगत' ने बरेचसे काही दिले आहे. त्यामुळे इथे राहूनच तुम्हाला वाटणाऱ्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करा, असा माझा (अनाहूत) सल्ला आहे.
सन्जोप राव