>>>> जाई आणि प्राजक्ताऐवजी कुठलेही फूल चालेल.
तुम्ही कोणतीही फुलं घाला बुवा. आपलं काही म्हणणं नाही बुवा.

>>>> वरच्या ओळीच्या खालच्या ओळीशी संबंध लागत नाही बुवा.
तुमच्या काव्याशी काही संबंध दिसत नाही बुवा.

>>>> मौन असेल तर सळसळ कसली. कल्लोळ कसला.
आपण एक प्रयोग करूयात का? मी मौन राहून तुमच्या (पक्षी एखाद्याच्या) गालावर पाच बोटांनी कल्लोळ करून दाखवते.

>>>> विरोधाभास म्हणजे गझल नव्हे.
गझलेत विरोधाभास येऊ नये असा कुठे नियम असल्याचं सिद्ध करा बुवा.

>>>> ओठांच्या सभोवताली ओठांचे कुंपण? काहीही.
कळेल, थोडे मोठे झालात की नक्की कळेल (अशी आशा करुया बुवा).

>>>> गात्रांतुन चूक.
मराठी भाषेशी तुमचा फारसा संबंध दिसत नाही बुवा.

>>>> तलख कसली? प्रणयाचे चंदन वगैरे भरीचे वाटते. लेउन चूक.
तलख चूक. तलखी शब्द आहे. तुम्हाला शेर कळला नाही यात काहीच आश्चर्य नाही. वाचकाचं अज्ञान म्हणजे कवीची चूक नव्हे. असं आपलं मला वाटतं बुवा.