संशयित प्रवाशांवर लक्ष ठेवणे , संशयित सामानाची तपासणी करणे यासाठी ही पोलीस यंत्रणा अधिक कार्यक्षमरीत्या वापरता येणार नाही का?

काही काळापूर्वी मी शिवाजीनगर- चिंचवड असा प्रवास करीत होतो. तो रविवार होता; पण सुट्टी व पावसाचा एक-दोन दिवस सतत झालेला शिडकावा, यामुळे लोणावळ्याला जाणाऱ्या तरूण प्रवाशांची अतोनात गर्दी झाली होती. जागाच मिळेना तेव्हा (कदाचित जागेची सबब असेल) कितीतरी तरूण महिलांच्या डब्यात शिरले. एवढ्या संख्येने पुरुष महिलांच्या डब्यात घुसणे मला खटकले. तेथून जाणाऱ्या रेल्वे पोलिसाच्या मी ही गोष्ट लक्षात आणून दिली. त्याने वैतागल्या नजरेने माझ्याकडे पाहिले. पुढे निघून गेला. जाता जाताच पुटपुटला," तुम्हीही जा!" हे पोलीस बऱ्याचदा काहीसे वैतागलेलेच जाणवतात. त्यांच्याकडून फारशा अपेक्षा ठेवता येतील असे वाटत नाही.

अवधूत.