मुंबई बाहेर रहाणाऱ्यांना अशी बातमी कळल्यावर प्रथम प्रतिक्रिया घरी फोन लावायची होते. त्यादिवशी फोन बंद होते. इथे परदेशात आपली माणसं अभावाने मिळतात. मनोगतावर एक प्रकारचा आपलेपणा मिळतो, त्यानिमित्ताने मराठीशी नाळ जोडलेली रहाते. ही गोष्ट प्रत्येकाला कळेलच असं नाही.
त्यातूनच चौकशी सुकर व्हावी या सद्भावनेने ती चर्चा टाकली होती.
संकट काळी सर्वप्रथम नैसर्गिक विचार आप्तांची काळजी असाच असतो. वांझोट्या चर्चा नंतर करता येतातच.
सदर चर्चा मात्र अनुताईंच्या क्र.३ मधला वादग्रस्त प्रकार म्हणावा लागेल.
आपल्या नावाव्यतिरिक्त कुठलीही माहिती न देणारी ही व्यक्ती दुसऱ्यांवर टिका कशी करू शकते?
त्या परत लिहिणार नाही म्हणताहेत ना, बरं झालं सुंठेवाचून खोकला गेला.