मुस्लिम अतिरेक्यांनी इतक्या भयानक, क्रूर कारवाया केल्या आहेत की मुस्लिम धर्म शांतताप्रिय आहे वगैरे स्तुतिसुमने उधळणाऱ्या मंडळींचा संताप येतो.
ह्या घटनांमुळे मुस्लिम समाजाबद्दल इतर लोकांना एक अढी वाटणारच. जर मुस्लिमांनी आणि त्यांच्या नेत्यांनी कंबर कसून आपल्या लोकांमधे शोध घेऊन असल्या अतिरेकी लोकांबद्दल खबरबात पोलिसांपर्यंत, मोठ्या नेत्यांपर्यंत पोचवाव्यात. अशा घटनांना प्रसिद्धी दिली जावी. अशाने अतिरेकी मुक्तपणे मुस्लिम भागात सहज फिरू शकणार नाहीत. कदाचित अशा खबऱ्या मुस्लिमांना त्याने धोका होऊ शकेल. पण तसे केले नाही तर मुस्लिमांविरुद्ध नेहमीच संशय येणार. नुसते रक्तदान वा मदत करुन मुस्लिमांविरुद्धचे किल्मिष जाणार नाही.
खरेतर केंद्रीय नेत्यांनी काहीतरी खंबीर कारवाई करुन दाखवली पाहिजे. पाकशी छान छान, गोड गोड, बोलणे, शांतीपाठ गाणे, बस वा रेल्वे सुरु करण्यासारखे भाबडे उपक्रम सुरु करणे काही काळ विसरुन काही तरी झटका बसेल असे करणे आवश्यक आहे. आर्थिक, सैनिकी, राजकीय काहीतरी कारवाई करुन पाकला चपराक देणे आवश्यक आहे.
पण मुस्लिम व्होटबँकेची गणिते समजणाऱ्या राजकीय पक्षांकडून कसली अपेक्षा करणार?
जाता जाताः शबाना आझमीने ह्या बॉंब हल्ल्याचा निषेध केला आहे का? कुणी काही वाचले वा ऐकले आहे का?