अमित आणि मंदार,
"सर्व मनोगतींना एक विनंती.. जमलं तर नेहमीच्या "गांधी/ गांधीविरोधी" साच्यातून बाहेर पडून, जरा वेगळ्या अंगाने/ ढंगाने ह्या विषयावर चर्चा करू या का?"
हे म्या तटस्थ वाचक पामराला पण बरोबर वाटते, पण असे दिसते आहे कि हा विषयही गांधी-अ-गांधी वर जाणार.(अमितसाहेबांच्या लेखात गांधी पहिल्या मुद्द्यावर असल्यामुळे त्यावर उत्साही मान्यवर मनोगती(आता वरच्या प्रतिसादांमधेच एक गांधींबद्दल आहे.) उलतसुलट मते व्यक्त करणार आणि परत फिरुन वाद 'गांधी' या मुद्द्यावर येउन अडकणार..)
तरीही आपल्या विषयाला शुभेच्छा. विषय खरोखरच चांगला आहे आणि त्यातून बाकी मनोगतींना बरीच नविन माहीती मिळेल.
आपली(शुभ बोल नारी)अनु