असे काही झाले असते तर गांधीजींनी काय केले असते? आपले पुढाऱ्यांना ते केवळ २ ऒक्टोबरलाच आठवतात.

- बॊम्बस्फोटाचा निषेध म्हणून सत्याग्रह करावा. म्हणजे शांततामार्गे निषेध नोंदवावा.
- अशा वेळी २ समाजात वितुष्ट येण्याची शक्यता असते तेव्हा अशा संवेदनशील भागांत दररोज उठून प्रभात फेरी काढावी.
- उपोषणाला बसावे. गांधीजी असे काही झाले की उपोषण करीत. गांधीजींचे निवडणूकांपुरते नाव घेऊन उपयोग नाही. त्यांनी सांगीतलेल्या मार्गावर चाललेच पाहीजे. म्हणून नेत्यांनी उपोषणाला बसावे. २०० लोक स्फॊटात मेले म्हणून २०० नेत्यांनी. विशेषतः कोंग्रेसच्या. कारण ते लोक फार गांधीजींचे नाव घेतात. यामुळे दहशतवाद्यांचे ह्र्यदयपरिवर्तन होण्यास मदत होईल. चांगली आमरण वगैरे उपोषणाची धमकी द्यावी. म्हणजे तेवढाच स्पेशल इफ़ेक्ट. अहिंसा, सत्याग्रह, उपोषण करून ब्रिटीश सुद्धा पळून गेले. अतिरेकीही जातील. मंत्री-गृहमंत्र्यांनी वगैरे चित्तशुद्धीसाठी, संयम वाढण्यासाठी निदान एकेक दिवसांचे का होईना पण उपोषण करावे.
मौनव्रत - शांतवृती, एकाग्रता यासाठी हे फार योग्य असते म्हणतात. पत्रकारांनी हे पाळावे.

सामान्य जनतेने शांतता राखावी. संयम बाळगावा. याचमूळे ६० वर्षांपूर्वी साक्षात ब्रिटीश पळून गेले होते. देश पारतंत्र्यातून मुक्त झाला होता. अशी तत्त्वे बाळगल्याने आतंकवादापासूनही मुक्ती मिळेल.