अहो प्रवासी महाशय,

माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही आहे. आणि कोणाचा अभ्यास किती हे मी किंवा कोणीही कसे ठरवणार ?

अभ्यास असणे ही काही चर्चेत भाग घ्यायची पुर्वअट नसेल पण काही पुर्णत: चुकीची विधाने ज्या बेधडकपणे केली जातात, किंवा माहिती घेण्याच्या उद्देशाने न विचारता उगाच उपहासाने प्रश्न विचारले जातात, आणि त्याला कोणी उत्तर न दिल्यास 'जितं मया' ची घोषणा केली जाते ते पटले नाही म्हणून लिहीले.  माझे विधान हे 'आडवे तिडवे उपहासात्मक प्रश्न आणि ठामपणे केलेली खोटी विधाने' यापुरतेच मर्यादित आहे.