"क्रमांक एक - या चर्चेच्या प्रस्तावाचे प्रयोजन कळाले नाही."
प्रस्ताव चर्चेचा करायचा नव्हता, पण मी त्याचे वर्गीकरण इतर प्रकारे करू शकले नाही. हे काही साहित्य वगैरे मध्ये मोडत नाही, म्हणून चर्चेत "विचार" या उपभागाखाली त्याचे वर्गीकरण केले. कोणाला प्रतिसाद दिला नाही, कारण त्यासाठी योग्य जागाच आढळली नाही. प्रियाली यांच्या प्रस्तावात लिहिले असते, तर नाम्या यांना जशी समज दिली गेली, तशीच मला दिली गेली असती. (नाम्या आणि मी दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहोत हे कळले असेलच.)मला माझ्या लिखाणाची वाचने व्हायला हवी होती (नाहीतर लिहायचेच कशाला?) म्हणून वेगळे लिखाण केले. अर्थात प्रियाली यांनी माझे लिखाण अनु यांच्या वर्ग क्र. तीन मध्ये घातले आहे, तेवढा माझा विचार नव्हता.
"मुंबईबाहेर रहाणारे दुसरे काय करू शकतात सांगा. ज्यांच्याशी मैत्री वगैरे तर सोडाच, पण ज्यांना कधी भेटलोही नाही, ज्यांना कधी पाहिलेलेही नाही अशा लोकांविषयी मनापासून वाटणारी काळजी याचे महत्त्व तुमच्या दृष्ट्या काहीही नाही? "
आहे, ते मनापासून आणि अतिशय आहे. मी "प्रेमाचे शब्द" म्हटले ते त्याचसाठी. माझा विरोध आहे तो केवळ तेवढेच करण्याला.
"अहो, हे फक्त 'मनोगत' वरच आहे असे नाही. समाजात सगळीकडेच हे आहे. हे कमी कसे करता येईल याविषयी काही सकारात्मक बोला की."
हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद. पण या प्रस्तावाला आलेले प्रतिसाद वाचून कोणी ऐकायच्या मनस्थितीत आहेत असे वाटत नाही. आणि सकारात्मक म्हणाल तर आधी आपल्यात काही त्रुटी आहेत हे मान्य करणे ही पहिली पायरी म्हणता येईल...
"आणि शेवटी...
'मनोगत' वरचा वावर हा काही विद्यापीठाने लावलेला सक्तीचा पेपर नाही. हा ज्याच्या त्याच्या खुषीचा मामला आहे. माझे वैयक्तिक मत विचाराल तर असंख्य मतभेद आणि भांडणे असूनही मला 'मनोगत' ने बरेचसे काही दिले आहे. त्यामुळे इथे राहूनच तुम्हाला वाटणाऱ्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करा, असा माझा (अनाहूत) सल्ला आहे."
सल्ल्याबद्दल धन्यवाद.
सुहासिनी