छान! मनोगतींना नेहमी सतावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे या लेखातून मिळतील अशी आशा.

"निव्वळ योगायोग" मालेत तुम्ही "महत्त्वाकांक्षेला" स्थान दिल्याने या लेखाला प्रतिसाद देणे बंधनकारक झाले आहे :)

अवांतर युक्त्या -

१. आपल्या लेखात इतरांच्या लेखाचा/प्रतिसादाचा संदर्भ द्यावा. त्यामुळे त्या लेखकावर प्रतिसाद देण्याचे बंधन येते. शिवाय लेखकाच्या कंपूतील आणि विरोधी कंपूतील लोकांचे अनुक्रमे अनुकूल आणि प्रतिकूल प्रतिसाद यांची "साखळी प्रक्रिया" (चेन रिऍक्श्न) सुरू होण्याची शक्यता असते.

२. जिथे शक्य होईल तिथे बादरायण/दूरान्वये संबंध जोडून "माझ्या एका लेखात/प्रतिसादात मी काहीसे असेच सांगायचा प्रयत्न केला होता" असे लिहून आपल्या लेखाचा दुवा द्यावा. दुवा पाहताच टिचकी मारण्याचा मोह टाळू न शकणाऱ्या दहा लोकांपैकी एखादा तरी प्रतिसाद देऊ शकतो.