त्यामुळे इथे राहूनच तुम्हाला वाटणाऱ्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करा, असा माझा (अनाहूत) सल्ला आहे." सल्ल्याबद्दल धन्यवाद.
राहायच म्हणताय का? तर मग आमची थोडी अधिक कान उघडणी कराच. असं आपल्याला सोयिस्कर असेल तेवढचं घेऊ नका.
पण नुसते, "जपा", "काळजी घ्या" वगैरे दिलेले सल्ले वाचून उद्विग्नता आली - त्या प्रेमाच्या शब्दांमुळे नव्हे, पण त्यापलीकडे जाऊन चर्चा न करण्याचा एकंदर प्रकार पाहून या चर्चास्थळाची मर्यादा कळली. काही बाबतीत, ज्याला त्याला आपापल्या उद्द्योगांना लागले पाहिजे हे खरे असले तरी, मला हा सर्व फारच मर्यादित प्रकार वाटू लागलाय. मिलिंद भांडारकरांनी चर्चेचा जो प्रस्ताव ठेवला तो वगळता, बाकी नव्या अर्थहीन चर्चा सुरूच आहेत.
आपल्या मनासारख्या चर्चा घडून येत नसतील तर इतर चर्चांना "लक्ष्य" करुन स्फोटाबाबत नवी चर्चा सुरु न करता त्याच काळात अशी फुटकळ आणि "नवी अर्थहीन चर्चा" सुरु करण्याचेही प्रयोजन सांगा. क्र. ३चा प्रयत्न नव्हता तर व्य. नि. ने कळवायचं होत, लेख लिहायचा होता.
गंभीर विषयाला उत्तरे देतानाही कंपूबाजी, काही लिखाणाकडे दुर्लक्ष करणे, आणि प्रसंगी बालीशपणा याचे सारखे नमुने बघायला मिळतायत.
असं चालत नाही त्या संकेत स्थळांची यादी द्या, मनोगताने तसंच का व्हाव हे पटवून सांगा. अमराठी दिली तर उत्तमच. मराठी लोकांवर आपला विनाकारण रोष दिसतो. "मी मराठी" या मागील एका चर्चेतही दिसून आला होता.
आपल्या मराठी लोकांमध्ये खूप अज्ञान आहे. आणि खूप भेकडपणा आहे. अगदी वेगळया नावांआडून लिहिताना देखील.
आपण इथे नव्या नाहीत. आरोप करण्यापेक्षा आपण असे अज्ञान दूर करण्याचा किती प्रयत्न केलात त्या बद्दल लिहा. तसेच, आपली खरी ओळख द्या. "ओळख" या चर्चेत आपला प्रतिसाद का नाही ते ही सांगा.
मिलिंद भांडारकरांनी चर्चेचा जो प्रस्ताव ठेवला (मिलिंदरावांचा व्यक्तिशः संबंध नाही) ती चर्चा अर्थपूर्ण कशी ते ही सांगा.
या प्रस्तावाला आलेले प्रतिसाद वाचून कोणी ऐकायच्या मनस्थितीत आहेत असे वाटत नाही.
आम्ही आहोत. सविस्तर, मुद्द्याला धरुन, क्र. ३ चा बालीशपणा किंवा उगाच नाक शिंकरून, की काहीतरी चर्चाविषय काढून, प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करुन लिहू नका म्हणजे आम्ही "अज्ञानी" तुम्हाला गंभीरपणे घेऊ.
आपला रोष काही व्यक्तींवर असेल तर जरा खुल्लम खुल्ला नावे लिहून सांगा. परत लिहिणार नाही, माझं कोणाला ऐकायच नाही हा भेकडपणा का?
असो. जायचं म्हणत असाल तर जा बापड्या. जात असाल तर इथे उत्तर द्यायला आपण बांधिल नाही.