असहायतेवर त्याने शूरतेचं नवं कवच घातलं आहे

तसा शूर कोण असतो? असं म्हंटल जातं की युद्धातही सैनिक फक्त स्वतःचा जीव वाचवत असतो (war of survival). असं जर इतर ठिकाणी झालं असत तर "मानसोपचार तज्ज्ञांच्या" धंद्यास अमाप बरकत आल्याच दिसून आलं असत. मुंबईत त्याची गरज भासत नाही(आपल्याला समुपदेशनाचे महत्त्व कळायचे आहे हा मुद्दा वेगळा) , तुम्हाला धीर द्यायला कुटुंब, सहप्रवासी आणि अनोळखी सहज भेटतात. संकट काळात सर्वसामान्य मुंबईकर धावून येतात ते शूर नाहीत?

घाबरणं सहाजिक आहे. असहाय्यता हा शूरपणाचा एक भाग आहे. ती माणसाला प्रसंगी "शूरच" बनवते.

मी राधिका यांची "निरोप" वाचली तर ती आई असहाय्य असली तरी शूर आहे कारण सर्वाचा विचार करुन, सर्वांची काळजी घेऊन घराबाहेर पडते आहे.