असहायता आहे हे सत्य मी नाकारत नाही पण असहायता म्हणजे पळपुटेपणा असे नव्हे.
असहायता म्हणजे शूरपणाही नव्हे. परवा पासुन सर्व नेते मंडळी एकच राग आळवता आहेत 'मुंबईची माणसं शूर आहेत ति कुणाला घाबरणारी नाहीत', 'दुसऱ्या दिवशी मुंबई पुर्ववत झाली'. तो लालू आला व मुंबईच्या शूरतेचे नाटकी गोडवे गाऊन गेला.
हा सर्व ढोंगी पणा नाही? काय पुर्ववत झाली? जी दोनशे माणसं मृत्यूमुखी पडली त्यांच काय? त्यांच्या घरच्यांची आयुष्य झाली पुर्ववत? मनावर झालेले आघात पुसले गेले?
एकदा शूर म्हणलं की झाल! परत मुंबईसाठी काही करायला नको. पुन्हा स्फोट होईस्तोवर किंवा नैसर्गीक आपत्ती येईस्तोवर मुंबईच्या समस्यांकडे बघायला नको आणि अस काही झालच की हे परत म्हणायला मोकळे 'मुंबईकर शूर आहेत, कुठल्याही संकटातुन ते मार्ग काढतात!' वर्षानुवर्षे हेच चालले आहे. म्हणुन मला वाटते की असहाय मुंबईवर शूरपणाचे बेगडी बिरुद लावु नका. त्या बिरुदाचाच असह्य भार होतो आहे..
पण दुर्दैवाने अस म्हणाव लागतय कि स्वतःच्या आकांक्षेने सैन्यात भरती होणारे आणि असहायतेने भरती होणारे यांचे प्रमाण व्यस्त आहे.
देश आणि सैन्यदळ असं त्यांना काय देतोय कि ते प्राणपणाने लढतात.
हे तुमच म्हणणे दुर्दैवाने संपूर्ण खरे आहे, पण कारगील युद्धाच्या वेळेस आपल्या सैन्याने जिवाची बाजी लावुन देशाच्या भूमीचे रक्षण केले हे तर नाकारता येत नाही..
राहुल