प्रियाली,  नमस्कार.  

"मी मराठी" हा प्रस्ताव वाचून मी मराठी लोकांविरुद्ध आहे असा जर आपला समज झाला असला, तर तो चुकीचा आहे.  तो का झाला हे कळत नाही.  जर तुम्ही ते नीट वाचले तर कळेल की मी मराठी लोकांविरुद्ध काहीच म्हटले नाहीय.   

इथे मलाही वांझोटी चर्चा करायची नव्हती.   लिहीले ते एवढ्यासाठी की आपण नुसत्या चौकश्या करीत राहतो हे लक्षात यावे. ( त्यामागे अनु यांच्या क्रमांक तीनचा संबंध लावून तुम्ही माझे वर्गीकरण करू पाहताय, तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे होते की मी सुद्धा पोटतिडिकीने बोलले असेन, कोणावर व्यक्तिगत शिंतोडे उडवायला नसेन...  आणि प्रसिद्धी मिळवायला मला इतर राजरोस मार्ग अनेक आहेत, त्यासाठी "ही" जागा मला गरजेची वाटत नाही - आणि एवढ्या दुखःद वेळी तरी नाही,  निदान तेवढा तरी मला "संशयाचा फायदा" द्द्यायला हवा होतात).

तुमच्या माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला काय करता येईल ते आपण करतो आहोत का हा खरा महत्वाचा प्रश्न आहे.   अजून एक, मी देखील मूळची मुंबईचीच आहे -मुंबईतच वाढले- शिकले, आणि कामही करत होते.  सध्या मुंबईत नाही, पण मला मुंबईचं अतिशय प्रेम आहे..  माझेही अनेक नातेवाईक व मित्र मुंबईत राहतात.  त्यांनाही स्फोटाच्या दिवशी माझे फोन लागत नव्हते, पण अनेकदा प्रयत्न केल्यावर लागले.  अनेकांना मी ई-मेल केल्या.  त्यांचे निरोप आले. 

आणि माझ्या कुळाची चर्चा मी येथे करण्याएवढी मी येथे जुनी नाही, माझी माहिती द्यावी यासाठी बांधील तर मुळीच नाही.  तुम्ही मी कुठे काय लिहिलंय हे पाहून मग मला प्रतिसाद दिलेला दिसतोय.  तुम्हाला हे मग कळेलच की गेल्या दोन-तीन महिन्यांतच मनोगतावर येते आहे आणि बऱ्याचदा तो वेळ वाचण्याचा असतो.  मी बऱ्याचदा जास्त  लिहीत नाही कारण मला कधी कधी हवे असूनही वेळ होत नाही. तरी मला माझ्या बद्दल मनात नसतानाही बरंच लिहावं लागलं असे मी म्हणेन. 

ही कदाचित त्याची जागा नसेल, पण अमोल यांनी जो अलिकडेच प्रस्ताव (बॉम्ब स्फोट दोष आणि जबाबदारी) मांडला आहे तो मला जास्त मुद्देसूद वाटला -"करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी " त्यात आहेत असं वाटलं. ( त्यांना किती जणांनी उत्तरे दिली?  त्यांनी तर खरोखरच मनापासून सूचना केल्यात मग त्या तुम्हाला पटोत वा नकोत.  त्यात भर घालण्याचे काम किती जणांनी केले?  त्यांना मी स्वतः उत्तर दिले नाही, कारण आधी लिहून बसले होते की परत मनोगतावर लिहिणार नाही! - आणि तुमच्या व छाया राजे यांच्या प्रश्नांना उत्तर म्हणून सांगते की यानंतर लिहिणार नाही.  अजून दुसरे नाव घेऊनही लिहीणार नाही ह्याचीही खात्री देते..).  आणि त्यांचा प्रस्ताव आधी आला असता, तर कदाचित मी हे लिहिले ही नसते.  

शिवाय मी कुठचाही व्यक्तिगत आरोप (ठरवून) केला नसताना माझ्यावर जेवढे व्यक्तिगत  लिहिले गेले आहे ते बघून आश्चर्य वाटले..   त्यासाठी जेवढा वेळ गेला असेल त्याच्या निम्म्याने वेळ वापरून तुम्हापैकी कोणी अमोल यांना प्रतिसाद दिल्याचे पाहिले नाही यात सर्व आलं.   काही "करत" असल्याची उदाहरणे दिली तर, किंवा जे काही करता येईल ते करू शकलो तर  तुमच्या माझ्या  वेळाचा खरंच चांगला उपयोग होईल. 

लिखाळ,

"कोठल्या अज्ञानाबद्दल आपण बोलत आहात ते समजलेच नाही."

मी अज्ञान अशासाठी म्हटले की जे प्रसंगाला धरून नाही, (यात प्रियाली यांच्या चर्चेचा प्रस्तावाचा समावेश नाही - खरंच- भेकड पणाने म्हणत नाही)  त्यावर लिहीत बसणं हा मला अज्ञानाचा प्रकार वाटला.

मला वाटते, ही माझ्यावरची चर्चा आता इथे बंद केली तर बरं होईल (मला वाटतं त्याप्रमाणे प्रतिसादांची संख्या कमी होईल व त्यामार्गे मला मिळालेली "प्रसिद्धी" पण). 

 

सुहासिनी