नीटच वाचलय मी ही आणि इतरांनीही. म्हणूनच अमोल यांच्या चर्चेला सोडून इथे वेळ वाया घालवतोय.
लेखिकेचा प्रयत्न प्रामाणिक व "मराठी" वाटतो. इतर कोणत्या राज्यातील व्यक्तींनी हे असे प्रश्न स्वतःबद्दल विचारले असते असे वाटत नाही. विशेषतः दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश येथील लोकांनी. "इतरांच्या मताची पर्वा करणे" हे ही मराठी व्यक्तींचेच वैशिष्ट्य दिसते.
आपल्याही मताची आम्ही पर्वा केलीच.
तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे होते की मी सुद्धा पोटतिडिकीने बोलले असेन, कोणावर व्यक्तिगत शिंतोडे उडवायला नसेन...
ही वेळ दुःखद आहे हे आपल्याला कळले असते तर असं काही बोलून गेला नसता आपण. व्यक्तिगत शिंतोडे ते आपण उडवलेतच.
अमोल यांनी जो अलिकडेच प्रस्ताव (बॉम्ब स्फोट दोष आणि जबाबदारी) मांडला आहे तो मला जास्त मुद्देसूद वाटला -"करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी " त्यात आहेत असं वाटलं. ( त्यांना किती जणांनी उत्तरे दिली?
जशा तुम्ही लिहिण्यास बांधिल नाही तसे आम्ही बांधिल आहोत का? हा प्रश्नच का उठतो?
शिवाय मी कुठचाही व्यक्तिगत आरोप (ठरवून) केला नसताना माझ्यावर जेवढे व्यक्तिगत लिहिले गेले आहे ते बघून आश्चर्य वाटले..
१.पण नुसते, "जपा", "काळजी घ्या" वगैरे दिलेले सल्ले वाचून उद्विग्नता आली (असे माझ्या चर्चेत आले होते, हा माझ्यावर आणि इतर मनोगतींवर फुकट वार नाही?)
२.त्यापलीकडे जाऊन चर्चा न करण्याचा एकंदर प्रकार पाहून या चर्चास्थळाची मर्यादा कळली. (हे अविचाराने काढलेले मनोगताचे वाभाडे, आता किती चर्चा सुरु आहेत ते पाहाता ना)
३. नव्या अर्थहीन चर्चा सुरूच आहेत. (पुन्हा मनोगत व मनोगतींवर शरसंधान)
४. आपल्या मराठी लोकांमध्ये खूप अज्ञान आहे. (हे मी व्यक्तिशः माझ्यावर घेते कारण मी मराठी आहे.)
५. खूप भेकडपणा आहे. अगदी वेगळया नावांआडून लिहिताना देखील. (हे ही मी व्यक्तिशः माझ्यावर घेते कारण मी घेतलेले नाव खरे की खोटे ते इथे एकालाही माहित नाही)
प्रत्येक प्रसंगाला वेळ काळ असते. अशा अनेक चर्चा येत राहतील. मनोगतींची काळजी विचारली तर आपल्याला उद्विग्नता आली. पोटतिडकीने आपण किती ठिकाणी लिहिलत?
मला वाटते, ही माझ्यावरची चर्चा आता इथे बंद केली तर बरं होईल
हे बाकी खरं.