सुहासिनी बाई या नक्कीच अतिरेकी असल्या पाहीजेत म्हणूनच इतका त्रागा प्रतिक्रीयांच्या शब्दातून व्यक्त होत आहे... शेवटी मुंबईत किंवा इतरत्र झालेल्या अतिरेकी हल्ल्यांवर बोलण्यापेक्षा स्वतःवर झाली असे वाटणाय्रा टिकेला सणसणीत उत्तर देणे हे जास्त महत्वाचे आहे...

काही वर्षांपुर्वी एक परीचीत व्यक्ती मला (मी विषय काढलेला नसताना!) एका सामाजीक कार्यक्रमात (माझे काम अडवून) तावातावाने म्हणत होती, "काश्मिर प्रश्न कसा भारतीय उगाच वाढवत आहेत. एव्ह्ढे काय झाले म्हणून आपण तिथे युध्द्सद्रुश्य राहावे किंवा आपले सैन्य ठेवून दहशत बसवावी? " पाच एक मिनिटे तिचे बोलणे ऐकल्यावर मी तिला (गमतीत पण मुद्दामून) विचारले, "आत्ता जर कुणी अगदी मी सुद्धा तुला थप्पड मारली तर तू काय करशील?" ती ताबडतोब चिडून म्हणाली की मी त्याचा किंवा तू (म्हणजे 'मी') असलो तर तुझा प्राणच घेईन!

म्हणालो की मला उत्तर आवडले पण एका'थपडेच्या' भाषेने तुला जीवा घ्यावासा वाटला, मग ज्याबायकांवार अत्याचार होताहेत, कुटुंबे मरताहेत त्यांच्या बद्द्ल काय वाट्ते? काही करायचे नसले तरी निदान काहीतरी बाश्कळ तरी बोलू नकोस...

आज आपल्यापैकी किती जणांना अशा गोष्टी घडतात (जिथे असाल तिथे), तेंव्हा  आपल्या लोकनियुक्त सभासदांना जाब विचारयला जावेसे वाटते? किती जण कुठल्याही सामाजीक गोष्टींमधे भाग घेता? स्वतःची काळजी घेण्यासाठी कितीजणांना समजतय की आपल्या आजूबाजूस आपले निट लक्ष हवय आणि तरीही कितीजण आपण जिथे असू तिथे "मला काय करायचे आहे" या व्रुत्तीने दुर्लक्ष करून राहणे पसंत करतात?

वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःची स्वतःलाच द्या (मला माहीत आहे की इथे कोणी देणार नाही!) मगच "सुहासिनी को गुस्सा क्यो आता है?" हे कळेल...नागरीक शास्त्र आपण 'इभूना' चा २०% भाग म्हणून (परीक्षेपुरते) शिकलो खरे पण व्यवहारात आपण १% ट्क्कातरी अमलात आणत असू का हा एक शोधाचा विषय ठरेल.

रामदासांच्या चार आठवलेल्या ओळी शेवटी सांगतो की ज्या या चर्चेच्या प्रतिक्रीया देणारयांना आणि या विषयावर चिडणाय्रांना लागू होतातः

स्वतःशी चिमुटा घेतला तेणे जीव कासावीस झाला

आपुल्या वरूनी दुसय्रासी वोळखावे॥

तात्पर्यः जे सध्या 'घडत' आहे आणि ज्यानी आपले आणि आपल्या स्वकीयांचे 'बिघडत' आहे, ते सुधारण्यासाठी आपण सक्रीय काय करू शकतो यावर चर्चा केलीत तर बरे.  न पेक्षा सुपामधे आणि जात्यामधे जास्त अंतर नसते, तेंव्हा आपल्यावरही असे प्रसंग 'स्वतःची काळजी" घेवूनही येऊ शकतील एव्हढे लक्षात असुदेत...

नाम्या