सुहासीनी ताई,

यकंदर तुमचा सुर असा दीसतोय की 'मनोगत' वर लोकसनी चर्चा करायच्या नसत्यात. नुसतच जपा रं , सांभाळा रं अशी सानुभुती दावायची असतीया..

म्या म्हनतो तुमचा ह्यो लय मोठा गैरसमज हाये.. अवो ताई हितं चर्चा करायचं वावडं कुनालाबी न्हाई. तुमी आनि नाम्या दोगबी हितं नविन दीसताय पन तुमासनी दोगानाबी २-३ प्रतिसादात पाक चितपट करतील असलं मुरल्याल पडीक मनोगती हितं कमी न्हाईत. तवा कराकी चर्चा करायची तिवढी. आमी हितं वाचायाच येतोया..

प्रियाली ताईंनी चालू केलेला 'धागा' येका मेका ची खुशाली कळवन्यासाटी आनि अजुन काही माहीति मिळाल्यास कळवन्यासाटी व्हता..जखम लै ताजी व्हती तवा..म्हनून कुनी निदान त्या धाग्यात तरी चर्चा करु नकासा असं त्यांनी लीवलेलं.चर्चा कराया पाक सगळं मनोगत तुमचच हाये.

ह्ये म्हंजी कुनीतरी गेल्यावर २ मिनिट शांत हुभाराया सांगीतलं आनि त्येवढी २ मिनिटं बी कळ न काढता नाम्या मागुन वरडला.."अवो त्यो मेलेला मानून पैसा खायचा म्हनं..." असाच प्रकार झाला बगा..

लक्षात येतयं नव्हका?

बाकी आमि अडानी गावाकडचं त्यात आदीच थोडं डोकबी कमी..तवा आमच मनाला लावुन घेउ नका.. गावाकडचं खुळं हाये म्हना आनि सोडून द्या...