"लेखिकेचा प्रयत्न प्रामाणिक व "मराठी" वाटतो. इतर कोणत्या राज्यातील व्यक्तींनी हे असे प्रश्न स्वतःबद्दल विचारले असते असे वाटत नाही. विशेषतः दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश येथील लोकांनी. "इतरांच्या मताची पर्वा करणे" हे ही मराठी व्यक्तींचेच वैशिष्ट्य दिसते. "

ह्यात काय चुकले?  ते माझे मत आहे.   पण त्यावरून ""मराठी लोकांवर आपला विनाकारण रोष दिसतो. "मी मराठी" या मागील एका चर्चेतही दिसून आला होता." असे आपले मत झाले असेल, तर आश्चर्य आहे..  आणि मी त्यातच बाकीचे जे काही म्हटलंय त्यावरून माझा विरोध कोणाला आहे ते कळायला शहाण्या माणसाला कठीण जाऊ नये! 

"नीटच वाचलय मी ही आणि इतरांनीही. म्हणूनच अमोल यांच्या चर्चेला सोडून इथे वेळ वाया घालवतोय."

--आता याला काय म्हणू? 

"जशा तुम्ही लिहिण्यास बांधिल नाही तसे आम्ही बांधिल आहोत का? हा प्रश्नच का उठतो?"

हे संदर्भहीन आहे. मी माझी ओळख करून द्द्यायला बांधील नाही असे म्हटले होते..

"(हे ही मी व्यक्तिशः माझ्यावर घेते  कारण मी घेतलेले नाव खरे की खोटे ते इथे एकालाही माहित नाही)"

अहो, आणि माझं नावही खरं सुहासिनी नाही..

"ही वेळ दुःखद आहे हे आपल्याला कळले असते तर असं काही बोलून गेला नसता आपण. व्यक्तिगत शिंतोडे ते आपण उडवलेतच."

कधी?  तुम्ही ते व्यक्तिगत घेताय, आणि सगळंच तुम्ही तसं घेताय.  असे करणं थांबवा, मग तुम्हालाच लक्षात येईल, की मी कशामुळे बोलले असेन.  कदाचित मीही खरंच बोलत असेन. 

"(हे मी व्यक्तिशः माझ्यावर घेते कारण मी मराठी आहे.)"

मी ही मराठीच आहे. 

"(हे अविचाराने काढलेले मनोगताचे वाभाडे, आता किती चर्चा सुरु आहेत ते पाहाता ना)"

मनोगताचे "वाभाडे काढले", तर तुम्हाला एवढा राग येतो.  तोच राग एतरत्र दिसला नाही, लिहिताना देखील.

"प्रत्येक प्रसंगाला वेळ काळ असते. अशा अनेक चर्चा येत राहतील. मनोगतींची काळजी विचारली तर आपल्याला उद्विग्नता आली. पोटतिडकीने आपण किती ठिकाणी लिहिलत?"

अशी वेळ आली नाही, नाहीतर लिहिलं असतं..   शिवाय मनोगतावर मी नवीनच आहे.   आणि तुम्हाला काय म्हणायचंय की २०० माणसे एकदिवशी मरणे, ह्याने मला तिडीक आलीच नसेल?  असं असेल तर तुम्ही स्वतः नीट विचार करून पहा.

""(पुन्हा मनोगत व मनोगतींवर शरसंधान)""असे माझ्या चर्चेत आले होते, हा माझ्यावर आणि इतर मनोगतींवर फुकट वार नाही?)"

नाही.  वार तुम्ही माझ्या वर करताय.  तुमच्या प्रस्तावात नंतर अनेकांनी हेच लिहीले आहे.  तुम्ही ते व्यक्तिगत घेताय.   हाच तुमचा राग सत्कारणी लावाल तर बरं होईल. 

आता माझ्या बाजूने मी काहीही अजून लिहिणार नाही.