एका पोवाड्यात (माझ्या आठवणीनुसार)शेलारमामाचे वय त्या लढाईच्या वेळी ९० वर्षाचे असल्याचा उल्लेख आहे. [तर तानाजीच्या मृत्यूनंतर शेलारमामाने त्याच्या मारेकऱ्यावर (राजपूत समाजाचा असणारा मोगली किल्लेदार उदयभानू) सूड उगविला, विशेष म्हणजे उदयभानूचे वय त्याच पोवाड्यात ३२ वर्षाचे दिल्याचे आठवते. तानाजीचे वयही सांगितले गेले आहे, पण आठवत नाही. ] ९० वर्षाचा वृद्ध लढू शकत असेल यावर विश्वास बसत नाही. त्यामुळे शेलारमामा ही व्यक्तिरेखा मलाही अतिशयोक्त वाटते.
आणखी एक गोष्ट : किल्यावर तानाजीने घोरपड चढविल्याचा पहिला उल्लेख (माझ्या वाचनानुसार) "गड आला पण सिंह गेला" या कादंबरीत आला आहे. म्हणजेच तानाजीची यशवंती ही घोरपड व तिची घटनाही काल्पनिकच.
अवधूत.