माझं नावही खरं सुहासिनी नाही..

माझं नाव मात्र खरं आहे. असो.

भेकडांच्या राज्यात आपले स्वागत आहे.

अशी वेळ आली नाही, नाहीतर लिहिलं असतं.. शिवाय मनोगतावर मी नवीनच आहे.

हो मग विचार करुन ही चर्चा सुरु करायला हवी होती. इतका विचार करायचा होता की गोष्ट ताजी आहे. एक चर्चा सुरु झालीये. बाकीच्या येतिल हळू हळू.

नवं जुनं असण्याचा काही एक संबंध नाही. आपण तितक्याशा नव्या नाहीत. नोंदणी केलेला प्रत्येकजण लिहू शकतो.

मनोगताचे "वाभाडे काढले", तर तुम्हाला एवढा राग येतो. तोच राग एतरत्र दिसला नाही, लिहिताना देखील.

"राग" हाशब्द कुठून आला आणि मला का चिकटवताय? तसा मला राग बिग येत नाही हो. आपल्या माणसांची विचारपूस करणे हे मला जास्त महत्वाचे वाटले. यावेळी राग आला तो अतिरेक्यांचा, आता त्यांच्यावर काढण शक्य नाही म्हणून तो मनोगतींवर का काढा?

आता माझ्या बाजूने मी काहीही अजून लिहिणार नाही.

बघू किती पाळताय?

 जे मेले त्यांच मनापासून वाईट वाटलं, खबरबात काढली. आपल्या कुटुंबातले आणि ओळखीचे सुखरुप आहेत कळल्यावर हायसं वाटलं. फोन केले, खुशाली कळली बरं वाटलं. त्यानंतर कामाला लागले,  कालही जेवले, रात्री झोपले, टीव्ही ही पाहिला, रोजचे सर्व कार्यक्रम केले.

मेलेल्यांसाठी उपास करावा, कोणाला तरी उग्गीच जाऊन हाणाव, रडत बसाव असं नाही वाटलं. मला "स्वार्थी" म्हणताय... हो आहे मी स्वार्थी निदान नाटकी तरी नाही.

आणि, शिवाजी माझ्या शेजारच्या घरात जन्माला यावा असंही मला वाटलं नाही.