असे अनेक संवाद माझ्या गठडीतही आहेत.
प्राचीला तिचे मन मोकळे करण्याकरता मैत्रिण मिळाली नाही का?
सांगता येत नाही. मला ३ वर्षे अशी कोणिही मैत्रिण मिळाली नव्हती.
खालचे संवाद पहाः
"एक मैत्रिण होती ती ही निघून गेली. आता काय दुकानात गळ्यात पाटी अडकवून उभी राहू की मित्र मैत्रीणींची गरज आहे."
हे मी प्रत्यक्ष ऐकलेलं, आणि हे माझे स्वतःचे शब्द मराठी विषयीः
"मी गेल्या कित्येक दिवसांत बोललेलेच नाही, कधी कधी शब्दच आठवत नाहीत." (मुलगी लहान असतानाचे, आनंद आहे की आता आम्ही भांडतो ही)
आपले अनुभव इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद.
dependent visa वर आलेल्या माझ्या सर्व मैत्रिणींनी बोअरपणा घालवण्याकरता मार्ग शोधले आहेत ते सविस्तरपणे मी लिहून ठेवले आहेत.
मनोगतावर टाका वेळ मिळाल्यास.