कुमारकाका,
अगदी तपशीलवार समजावल्याबद्दल आभार. पण दोन ठिकाणी मतभेद नोंदवतो.
रवि (सूर्य) हा शब्द मराठीतही ऱ्ह्स्वच आहे असा माझा समज आहे.
तसेच चक्रपाणि या मधे 'पाणि' हा शब्द हात या अर्थाने आहे आणि तो ही शब्द ऱ्हस्वच राहील असे वाटते.
मी भाषातज्ज्ञ नाही, त्यामुळे हे चूकही असेल.
>>>
भीमपलासमधे शुद्ध निषाद लावून गुण मिळवणारे एकटे बालगंधर्वच होते!
क्या बात है.
-विचक्षण