मृदुला, एकलव्य म्हणाला ते अगदी खरं आहे. हा रोग संसर्गजन्य नाही आणि अस्वच्छतेशी निगडीत नाही.
इथे आमचं घर काहीसं या तडाख्यातून बाहेर निघायचा प्रयत्न करतं आहे म्हणेतोवर आमच्या घरी काम करणाऱ्या बाईकडे तिच्या मुलीला ( जिला एक तान्हं बाळ आहे )झाला आहे हा रोग. आईबाबाश्री तिघंही आजारी पडले, घरी स्वयंपाक करायला कोणी नाही बघून शेजारच्या रोहिणीकाकूंनी ( त्या मनोगती नाहीत ) जेवण बनवून दिलं होतं परवा तर त्यांना आणि रमेशकाकांनाही झाला आहे आता हा चिकुनगुन्या ! मी इथे आल्यानंतर माझ्यासमोर कित्येकांना झाला आहे हा रोग. मला नाही झालेला अजूनतरी पण ह्या डासांच्या वृद्धीला आडसर बसेल असा काहितरी नामी उपाय असल्यास सांगा.. खूप जिवांचे हाल कमी थांबवता येऊ शकतील.
एक माहिती हवी होती.. हा रोग एकदा झाल्यावर परत होऊ शकतो का? एकलव्यच्या मदतीने मिळू शकलेल्या माहितीतून कळलं होतं की या रोगाच्या उपचारपद्धतीत खूप सारे अँटीबायोटीक्स दिले गेलेले असल्याने एकदा झाल्यावर हा रोग परत होत नाही. पण नुकत्याच कळलेल्या माहितीनुसार मात्र परत होऊ शकतो म्हणे हा रोग. उपचार चालू असतानाच परत ते डास चावत राहिल्यास काय होईल? तान्ह्या/अगदी लहान बाळांनाही होऊ शकतो का हा रोग?