कोणत्याही प्रकारच्या शास्त्रीय तथ्याचा आधार नसलेले आणि अंधश्रद्धेच्या जवळपास जाणारे अनुभव चर्चेसाठी मांडणे पोरकटपणाचे वाटते.

गुरु महाराज कधी कोणाच्या घरी जात नसत.. ते बहिणीच्या अग्रहावरुन तिच्या घरी आले..

ते कोणाला त्यांचा फ़ोटो काढु देत नसत..

बहिणीच्या अग्रहावरुन ते फ़ोटो करता तयार झाले..

या परस्परविरोधी विधानांतून काय सुचवायचे आहे? चर्चेचा विषय गुरुमहाराज आहेत, त्यांचे चमत्कार की आपली बहीण?
आपण अमेरिकेतून आल्यानंतर हे छायाचित्र एखाद्या व्यावसायिक छायाचित्रकाराला दाखवून त्यावर त्याचे मत घेऊन मग बोला. तोवर मात्र हा थापेबाजीचाच प्रकार वाटतो.

कृपया हलकेच घेऊ नये.