अशा खूप कथा मी ही ऐकल्या आहेत. पण त्या सगळ्याच कथांमध्ये एक समान बाब आढळली. एक तर त्या घटना खूप वर्षांपूर्वी घडतात किंवा कोणत्यातरी अती दूरच्या प्रदेशात घडतात, जेणे करून त्यांची सत्यासत्यता पडताळता येऊ नये. मी ऐकलेली एक कथा.
"बऱ्याच वर्षांपूर्वी, साधारण पणे १९५० च्यासुमारास, एका माणसाकडे अद्भुत शक्ती होती. आपल्या कॅमेऱ्याचे झाकण न काढता तो कोणत्याही स्थळाचे/वास्तूचे केवळ स्मरण करून त्याचा/तिचा फोटो काढू शकत असे."
वरील कथेतील माणूस तर सोडाच, पण फोटोसुद्धा कथा सांगणाऱ्याने पाहिलेला नव्हता. दुसरी बाब, तो माणूस कोण होता, कोठे राहत होता हे सुद्धा कथा सांगणाऱ्याला माहीत नव्हते.
मी म्हणत नाही की सांगणारा खोटे बोलत होता, त्याने जे ऐकले तेच तो सांगत होता. पण त्याने यामागची शहानिशा करायचा प्रयत्न केला नाही.
नितीन, तुझ्या बाबतीतही मला हेच म्हणावेसे वाटते. तू किती छायाचित्र तज्ञांना हा फोटो दाखवला होतास? त्या फोटो मध्ये असणाऱ्या बाकीच्या मंडळींना तू भेटला होतास का? फोटो काढल्यानंतर तुम्ही गुरू महाराजांना भेटला होतात का?
कोणत्याही घटनेमागचा कार्यकारण भाव समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलाच पाहिजे.