कविता अक्षरगणव्रुत्तात लिहिण्याचा बेत होता. म्हणूनच १२-१२ अक्षरांचे चरण करण्याचा प्रयत्न केला पण प्रवाही पणासाठी शेवटच्या दोन शेरांची पहिली ओळ १३-१३ अक्षरांची करावी लागली. पण हिंदी गझलच्या शेरांमध्येही पहिली ओळ flexible असल्याचे दिसते. म्हणून त्याकडे काना-डोळा केला. आपल्या म्हणण्याप्रमाणे मात्रा कमी पडणाऱ्या ओळीत

हा~त हे उरलेत बा~की द्यायचे

   का~ळजा~ला कसे भिडले न गाणे

असे वाचले तर मात्रा बरोबर होतील असे वाटते. आणि शेवटच्या कडव्यात आपण सुचविलेली दुरुस्ती  प्रवाहीपणाच्या द्रुष्टीने अगदी चपखल बसते.
पण या ओळीत कवीचे औदार्य नसून त्याची अगतिकता हा सांगण्याचा मुद्दा आहे. त्यामुळे अभिप्रेत अर्थाशी तड्जोड केल्यासारखे होईल.

असे मज पामराच्या अल्पबुद्धीला वाटते....

ता.क. ------तरीही चू. भू. द्या. घ्या. या नात्याने मी आपल्या सूचनांवर    विचार केला असून हा विरोधासाठी विरोध नाही
याची नोन्द घ्यावी ही विनंती.  

 

 

 

गझल

चांदण्यांचे प्रेमही पाहून झाले (१२)
कोकिळांचे गीतही गाऊन झाले(१२)

प्राक्तनाला दान केले सर्व काही(१२)
आसवांचे बांधही वाहून झाले(१२)

हात हे उरलेत बाकी द्यायचे(१२)
घेतलेले सर्वही देऊन झाले(१२)

काळजाला कसे भिडले न गाणे?(१२)
सर्व साती सूरही लावून झाले(१२)

ऐन मोक्याला कसे फिरलात देवा?(१३)
सावलीचे झाड कैसे ऊन्ह झाले?(१२)

रे ऊन्हा हवेच आता काय तुजला?(१३)
मानसीचे फूल तेही जून झाले...(१२)

 

आ.(चू.भू.द्या̱. घ्या.)
स्वप्निल