स्वप्नील, कृपया राग येऊ देऊ नकोस, पण तुझी अक्षर -गण वृत्ताची माहिती अपुर्ण आहे असे मला वाटते, अक्षर -गण वृत्त म्हणजे निव्वळ अक्षरांची संख्या नसुन लघु-गुरु अश्या एका विशिष्ट क्रमात असलेल्या प्रत्येकी तीन-तीन अक्षरांचा गणाने बनलेले वृत्त आहे...आणि मात्रा कमी पडणाऱ्या ओळीत केवळ मात्रांचे गणित जुळावे म्हणुन शब्द तोडुन वाचण्याची पद्धत कुठेही अस्तित्वात नाहीये, असे मला वाटते. तु लिहिलेले आकडे हे अक्षरांची संख्या दर्शवितात... मात्रांची नाही..जाणकारांनी अधिक मार्गदर्शन करावे..
-मानस६