माझ्याही अगदी जवळच्या नातेवाईकांपैंकी सैन्यात कोणीही नाही.

 सुट्टी नाही, कुटुंब बरोबर ठेवू शकत नाही. एकदम या वयांत नोकरी सोडायची म्हंटल तर दुसरं काय करायच हा प्रश्न आहेच.

मला वाटतं की आजकाल दुसऱ्याही काही क्षेत्रांत नोकरी केली असतां हा प्रश्न उद्भवत असावा. अगदी वातानुकुलीत कचेरीत बसुन काम करणाऱ्या व्यक्तीलाही या समस्यांना तोंड द्यावे लागते.

 हे मान्य की सैनिकांवर केव्हाही जीव गमावण्याची वेळ येऊ शकते. त्यांच्या नोकरीत त्यांचे प्राण पणांला लावावे लागतात पण सद्य परिस्थितीत कोणाचा जीव १००% सुरक्षित आहे‌? सकाळी ऑफीसला गेलेली, वातानुकूलित कचेरीत बसून आणि ढमाढम पगार घेणारी व्यक्ती संध्याकाळी परत घरी येईलच याची शाश्वती आहे का?

सैनिकांची कुतरओढ, असहायता प्रकर्षाने जाणवते परंतु हा थोड्याफार फरकाने ती सैनिक नसलेल्या व्यक्तीचीही होते एवढेच म्हणायचे आहे.

मी माझ्या अपत्यांना कुठल्याही क्षेत्रात जाण्यापासून अडविणार नाही

यांवर फास्टर फेणें शी सहमत.