चुलत बहीणीची सुद्धा इच्छा होती, परिक्षा सुद्धा दिल्या पण विमानदळाच्या शेवटच्या चाचणीत अनुत्तिर्ण झाली. मग तिचं लग्न झालं आणि ती संसारात रुळली.

वाचून बरं वाटलं, यश अपयश या वेगळ्या गोष्टी.

पण काय करता येण्या सारख आहे? ते आयुष्य तसच असाव.

वर सांगितल्याप्रमाणे आपण वातानुकूलित कचेरीत बसून आणि ढमाढम पगार घेऊन लांब चेहऱ्याने उद्विग्नता आणि पोटतिडिक आणून लंब्या चौड्या बाता ठोकतो. (जाम राग आला, आतल्या आत जाम गरम होतयं म्हणून तापमान हळूच कमी करतो)

आपले नेते, लोकनायक, मंत्री, लोक प्रतिनीधी यांचे नातेवाईक आप्त स्वकिय सुरक्षा दळात आहेत का? आत्यंतिक प्रेमापोटी आणि नाईलाज, गरीबी, कौटुंबिक दडपण या पोटी सैन्यात भरती होणारे यांचे व्यस्त प्रमाण लक्षात घेतो का?

---

फा. फे. हे केवळ आपल्या साठी नाही हं, माझ्यासकट सर्वांसाठी.