कथेतिल काही मुद्दे बारकाईने लक्षात घेतल्याबद्दल अनेक धन्यवाद. काही मनोगतींनी व्य. नि. ने आपल्या भावना कळवल्या त्यांचे ही आभार.

खुशाल रडा. बघू कोण काय म्हणते ते. रडणे ही काही स्त्रियांची मिरासदारी नाही. पुरुषांचाही तो हक्क आहे.

लहान वयांत उच्च रक्तदाब आणि हृदय विकार जडण्याच्या वाढत्या प्रमाणाचे एक कारण आपल्याला दुसऱ्याकडे मन मोकळ करता येत नाही हे अशा पुरुषांना कळलं तरी खूप आहे.