माझी काही पुस्तके आणि बरेच लेख प्रकाशित झालेले आहेत. मात्र नेटवर काही नाही. महत्वाची पुस्तके - "रसचर्चा" (पॉप्युलर प्रकाशन, मुंबई (१९९४). याला महाराष्ट्र राज्य पारितोषिकाशिवाय आणखी अनेक पारितोषिके मिळाली अहेत. यात भारतीय समीक्षासिध्दांत म्हणून रससिध्दांताचा विचार आहे. तर दुसरे "रसः सिध्दांत आणि सिध्दी" (पुष्प, पुणे, १९९४) यात रससिध्दांत काही साहित्यकृतींना लावून पाहिला आहे; याच्या सहलेखिका माझ्या पत्नी डॉ. उमा दादेगावकर या आहेत.

अलीकडे "एका रात्रीचा प्रश्न" (दिलीपराज, पुणे (२००६) यात एका कन्नड व एका मल्याळी असा दोन कादंबऱ्यांचा अनुवाद आहे.

पद्माकर दादेगावकर, हैदराबाद, भारत