विडंबन हा साहित्याचा एक दर्जेदार प्रकार आहे. समर्थ विडंबनकार विडंबनाला मूळ कृतीच्या दर्जाच्या जवळपास, क्वचित वरही घेऊन जातो. उत्तम विडंबन ही एक चांगली स्वतंत्र रचनाही होऊ शकते. बिडंबन ही मूळ रचनेतील अतिरेकीपणाची अभिरुची राखून केलेली टिंगल असते. माधव जूलियनांच्या कवितेतील अतीभावुकपणा किंवा केशवसुतांच्या कवितेतील स्वप्नाळू आदर्शवाद याची आचार्य अत्र्यांनी उत्तम विडंबने केली आहेत.
रिमिक्स हा तद्दन बाजारूपणा आहे. मूळ गाण्यापेक्षा चांगले रिमिक्स माझ्या ऐकण्यात नाही. शिवाय मूळ कलाकृतीशिवाय रीमिक्सला अस्तित्वही नाही. त्यामुळे रिमीक्स आणि विडंबन यांची तुलनाच होऊ शकत नाही असे मला वाटते.