गंगे,
मला वाटतं की आजकाल दुसऱ्याही काही क्षेत्रांत नोकरी केली असतां हा प्रश्न उद्भवत असावा. अगदी वातानुकुलीत कचेरीत बसुन काम करणाऱ्या व्यक्तीलाही या समस्यांना तोंड द्यावे लागते.
चर्चा या गोष्टीवर नको आहे. असहाय आणि गरजवंत प्रत्येकजणच असतो. पण गेल्या १० वर्षात वातानुकूलित कचेरीतील आपल्याला अधिक सोयिस्कर नोकरी हवी म्हणून नोकरी बदलणारे किती आणि अशी नोकरी सहज बदलता येणारे सुरक्षा दळातले अधिकारी किती?
सद्य कालात देशाचे सैनिक निधड्या छातीने घाला रे माझ्या छाताडावर गोळी मी शूर आहे "केवळ" अशा भावनेतून सैन्यात भरती असतात असा आपला (गैर)समज आहे का? हे जाणून घ्यायच आहे.
असो. प्रामाणिक उत्तरा बद्दल धन्यवाद.