एक महत्वाची  चर्चा सुरु केल्याबद्दल धन्यवाद ! माझे कुणीही नातेवाईक सैन्यात नाही. पण मामा सैन्यातील सिव्हील होता. सैनिकांचे महत्व वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. पण हे विचारात घ्यायला हवे की आपण त्यांना काय देतो ? एका IAS ऑफीसची बडदास्त पहा आणि सैनिकाच्या सवलती पहा. माझ्या  परिचयातील एका जणांचा मुलगा कारगीलच्या युद्धात लढला व त्याने दोन अतिरेकीही मारले आहेत व तेव्हा तो फक्त २४ वर्षांचा होता. त्याचे वडील हे भारतीय नागरी सेवेतील अत्युच्च पदावर आहेत. त्यामुळे तो नाईलाजाने न जाता ध्येयवादी वृत्तीने गेलेला आहे व आजही कार्यरत आहे. पण आईला भेटायला येताना हजारो किलोमीटर बर्फ तुडवून गाडी पकडावी लागते, सुटी वैगरे नेहमीचे आहेच. त्यावेळी नकळत संशोधन क्षेत्रातील मित्र आठवतात . परदेशी वाऱ्या आणि महिना लाख रुपये फेलोशिप पण ध्येयाच्या नावाने बऱ्याचवेळा शून्य ! अर्थात ही तुलना नाही कारण दोन्ही क्षेत्र वेगळी आहेत. पण तरीही दोघांकडे माणूस म्हणून बघताना ही तफावत मनाला त्रास देते हे नक्की व मन अपराधी भावनेने भरून जाते. सैनिकांच्या कुटुंबियांना इतक्या सवलती  द्याव्यात की त्यांना निश्चिंतपणे काम करता यावे. काळजी राहू नये. शेवटी माणूस म्हणून त्यांची ही काही सामान्य स्वप्ने आणि अपेक्षा असणारच आणि त्यात गैर ते काय ?

माझी ' तुमच्या आमच्यासाठी कुणी ' ही कविता मी खरे तर आमच्या ओळखीच्यांच्या त्या मुलासाठीच लिहिली आहे.

परत एकदा धन्यवाद !

अभिजित