माझे दोन्ही मामा स्थल सेनेत डॉक्टर होते. मोठा मामा तीनही लढायांच्या वेळेस (१९६२, १९६५, १९७१) युद्धभूमीवर होता. मीही वायुसेने मध्ये अभियंता पदावर जाण्यासाठी Univercity Entry Scheme मधून प्रयत्न केला होता. पण मुलाखतीमध्ये गळालो. पुन्हा दुसरा प्रयत्न मी Short Service Commission मधून केला. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालो पण त्याआधीच काही घटनांमुळे संगणक क्षेत्रामध्ये प्रवेश केला. माझ्या मुलांबद्दल म्हणाल तर, तो निर्णय सर्वस्वी त्यांचा राहील पण मी त्यांना सैन्य दलाचा विचार करण्याचा सल्ला नक्कीच देईन.