या अनुभवावर अविश्वास दाखवणारी मंडळी योग्य तेच करीत आहेत.यालाच चार्वाक (चारु+वाक)म्हणतात पू.पांडुरंगशास्त्री आठवले यानी हा शब्द वापरला आहे.वेदात जे सांगितले त्या प्रत्येक गोष्टीला यात काय आहे,त्यात काय आहे.उदा.प्रार्थनेत काय ठेवलय, संध्या कशाला त्यात काय ठेवलेय,म्हणजे लोकाना जे अवघड वाटते ते करण्यात काही तथ्य नाही असे सुचवायचे म्हणजे लोक ते सोडायला अगोदर एका पायावर तयार असतातच त्याना एकदम शास्त्रीय आधार पुरवतात. असे म्हणणारे लोक इतराना पसंत पडणारे भाषण (चारु =गोड,आवडणारे वाक=बोलणे)करतात.
या अनुभवासारखेच बॅ, अप्पासाहेब पंत याना आलेले दोन अनुभव देत आहे श्री. अप्पासाहेब पंत स्वतः विचाराने अगदी विवेकवादी होते ही गोष्ट महत्त्वाची !
बॅ. अप्पासाहेब पंत इंग्लंड,पू.आफ्रिका,सिक्किम इ. ठिकाणी भारताचे राजदूत म्हणून कार्यरत होते.ते सिक्किम मध्ये असताना तेथील बौद्ध धर्मगुरूची भेट घ्यायला गेले तेव्हा ते हसले आणि म्हणाले ,"तू येथे कोणाबरोबर आला आहेस?" यावर अप्पासाहेबानी आश्चर्याने आपण एकटेच आल्याचे सांगितले "तुझ्यामागे तुझ्या रक्षणकर्त्याची सावली स्पष्ट दिसते आहे "असे म्हणून त्यानी जे वर्णन केले ते हुबेहूब श्री अप्पासाहेबांच्या वडीलांचे म्हणजे औंध संस्थानचे महाराज श्री.बाळासाहेब पंत यांचे वर्णन होते.त्या धर्मगुरूनी बाळासाहेब अथवा त्यांचे छायाचित्रही कधी पाहिले नव्हते असे अप्पासाहेबानी लिहून ठेवले आहे.दुसऱ्या एका प्रसंगात ते धर्मगुरूची गाठ घेण्यास गेले त्यावेळी त्याना इतक्या खडतर हवामानातून प्रवास करून जावे लागले की आपण जिवंत पोचतो की नाही याविषयी त्याना शंका उत्पन्न झाली होती.धर्मगुरूंची भेट झाल्यावर त्यानी हा प्रकार त्याना निवेदन केला त्यावर ते म्हणाले ,'आम्हाला अगोदर कल्पना दिली असती तर त्याची काळजी आम्ही घेतली असती यापुढे जर कधी जरूर पडले तर अगोदर आम्हाला कळवत जा" यावर अप्पासाहेब यांचा काही विश्वास बसला नाही,पण तेथील काही मंडळीनी धर्मगुरु खरेच असे करू शकतात असे सांगितल्यावरून त्यानंतर खरोखरच एकदा असा प्रसंग आला तेव्हा अप्पासाहेबानी त्याना कळवले.त्यावेळी एक सभेचे आयोजन त्यानी उघड्यावर केले होते आणि आयत्यावेळी पाऊस येण्याची शक्यता दिसू लागली तेव्हा त्यानी धर्मगुरूना कळवले तेव्हा त्यानी सांगितले "तू निश्चिंत रहा "आणि खरोखर बाकी इतर सर्वत्र पाऊस पडत असताना सभेच्या तेवढ्या भागावरच जणू छत्री धरल्यासारखा पाऊस पडत नव्हता.
वरील दोन्ही अनुभव श्री अप्पासाहेब पंत यांच्या Moments in time या पुस्तकात कोणालाही वाचायला मिळतील,यावर विश्वास ठेवायचा की त्यालाही बाष्कळपणा ठरवायचे हे मी स्वयंसिद्ध चार्वाकांच्यावरच सोपवतो.