अरे वा वा 'चमत्कार' घडू शकतात असे मानणारे अजून काही लोक आहेत तर. :)
बरं.. या छायाचित्र प्रकारबद्दल अजून काही.
अध्यात्मक्षेत्रातल्या बऱ्याच लोकांची छायाचित्र प्रकाराबद्दल ही भूमीका असते असे काही वाचना नंतर वाटते. माझ्या आठवणीप्रमाणे 'योगीकथामृतामध्ये' परमहंस योगानंदांनी, त्यांचे आजेगुरू लाहिरी महाशय यांबद्दल असेच काही सांगितले आहे. (चु. भू...) तसेच गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात सुद्धा असाच एक प्रसंग वर्णन केलेला आहे.
प्रथमतः या गोष्टी घडूच शकत नाहीत असे मला अजिबात वाटत नाही. कारण या प्रकाराचे दाखले देणारे संत या बाबतीत खोटे कथन करतील असे मला वाटत नाही.
आपला,
--लिखाळ.