माझ्या एका दूरच्या चुलत बहिणीचे यजमान सैन्यात अभियंता आहेत.

माझा एक जवळचा मित्र पायदळात आहे. मी त्याला गेली १५ वर्षे ओळखते. आवड म्हणून तो सैन्यात गेला. त्याच्या वडिलांचीही सैन्यात जाण्याची इच्छा होती, मात्र ते जाऊ शकले नाहीत (कारणे मला माहीत नाहीत). जेव्हा माझ्या मित्राने त्याच्या वडिलांना त्याची इच्छा सांगितल्यावर आनंदातिशयाने त्यांनी त्याला मिठीच मारली असे तो सांगतो. आता तो पायदळात मेजर आहे.

माझ्या आणखी एका मित्राने सैन्यात भरती होण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न केले. मात्र त्याची निवड झाली नाही.

माझीही सैन्यात जाण्याची इच्छा होती. वायुदलामध्ये हवामानतज्ज्ञाच्या जागेसाठी अर्ज भरून मी लेखी परीक्षा दिली, उत्तीर्ण झाले. त्यासाठी डेहराडूनच्या कॅम्प मध्ये काही दिवस होते. मुलाखतीत मात्र माझी निवड झाली नाही. झाली असती तर मला आनंद वाटला असता. असो. तर ही माझी गंगाजळी.

सैन्यातील लोकांना, त्यांच्या घरच्यांना स्वस्त दरात वस्तू मिळतात. इतरही फायदे आहेत. आता सैन्यातील लोकांना जिवाची भिती सामान्यांच्या तुलनेत अधिक असते हे खरे, मात्र तो त्यांच्या कामाचाच एक भाग आहे. त्यामुळे जे सैन्यात जातात त्यांना जाण्यापूर्वी तशी स्पष्ट कल्पना असते. त्यामुळे मला त्यांच्या बद्दल सहानुभूती असली, तरी ती अतिप्रमाणात नाही.