मानवी मर्यादांच्या पालीकडील गोष्टी... हे सगळे इतरांच्या बाबतीतच का होत
- होईल होईल, तुमची ती पात्रता असेल तर होईल. १० वी नापास झालेला विद्यार्थी 'मला डिग्रीचे पारितोषिक का मिळत नाही, इतरानंच का मिळते' म्हणून रडला, तर त्याला कोणी पारितोषिक देईल का?
'मला स्वतःला हा अनुभव आला आहे'
- असे सांगणारी, माझी बहीण व मेहुणे.
'मला स्वतःला हा अनुभव आला आहे' असे सांगण्यापेक्षा अमक्याला असा साक्षात्कार झाला, तमक्याला असा दृष्टांत झाला असेच का सांगितले जाते?
- तुम्ही स्वतः आध्यात्मिक प्रयन्त काय केले हे समजेल का?
प्लँचेटने मृत व्यक्तींच्या आत्म्याशी संपर्क साधणारी वाटी आमच्यासारख्या नास्तिकांचे बोट लागले की तीळभरदेखील हालत नाही, हे कसे?
- मला प्लँचेटचा अनुभव आहे. तुम्हाला जो अनुभव आहे तो सर्वांना येणे जरूरी आहे का? आणी तुम्हाला अनुभव आला नाही म्हणून ते खोटे? (तुम्ही स्वतःला जरूरी पेक्षा शहाणे समजता असेच वाटे.)
भानामती, करणी, अंगावर बिब्ब्याच्या फुल्या उमटणे, कपडे आपोआप पेट घेणे हे प्रकार घरातल्या लोकांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रश्न सुटले की आपोआप थांबतात, हे कसे?
- ह्या विषयात मला काही अनुभव नाही. आणि हा विषय किंवा अंधश्रद्धा ह्या विषयांवर वाद अपक्षीत नाही.
मग एखाद्या निर्जीव पदार्थातून उच्च विद्युतदाब सोडून त्याचे चित्रण केले तरी असेच तेजोवलय दिसते, हे कसे काय?
- ह्याला शास्त्र असे म्हणतात.
पाऊस कृत्रिम पद्धतीने (शास्त्रीय) पाडता येतो, तसेच इतर पद्धतीने (बरेच प्रकार आहेत त्यात आध्यात्मिक शक्ती आली) पाडता येतो. तुमच्या ज्ञानाला व बुद्धीला खूपच मर्यादा असल्याने समजत नाही.
येशूचे प्रेतवस्त्र, पैगंबराचा पवित्र केस, ज्ञानेश्वरांच्या समाधीचे अंतरंग यांची (समाधीला कोणताही धक्का न लावता करता येण्यासारखी) तपासणी, याला इतका विरोध का?
- ह्या पवित्र लोकांना त्यांच्या जिवंत पणे, खरे - खोट पडताळण्या करता तुमच्या सारख्यांनी छळले आहेच. अजून तुमचे समाधान झाले नाही का?
ह्या पवित्र लोकांना समजण्या करता, त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे जिवन जगा आणी पाहा, प्रत्यय येतो का नाही ते. पण ते करायची हिंमत आहे कोणाला? वाद घालणे सोपे म्हणून वाद घालत बसा.. शाब्दिक प्रभुत्व दाखवा, किंवा वैचारिक कोलांट्या मरा.. ह्या प्रवृत्तींचे राक्षस ह्या जगाला नवीन नाहीत.
व्रतवैकल्य, कुळाचार, हरितालिका, ऋषीपंचमी, गौरीगणपती, नवरात्र, मंगळागौरी, एकादशी, चतुर्थी अशी भरभक्कम दैवी संपत्ती बाळगणाऱ्या देशातल्या अर्ध्याहून अधिक महिला कोणत्या ना कोणत्या दृष्टीने कुपोषित, आणि दरवर्षी कित्येक लाख महिला आणि अर्भके बाळंतपणातच मृत्युमुखी हा कोणत्या देवाचा न्याय?
- देवाचा न्याय समजण्याची आपली लायकी असावी लागते. (ती माझी सुद्धा नाही असेच वाटते!)
आपल्याला मागे नेणाऱ्या अशा विषयांवरच्या चर्चेत 'असेल बुवा काहीतरी...' अशी ठिसूळ आणि विवेकहीन भूमिकाच मुख्यत्वे दिसते, हे का?
- ही तर मला तुमची भमीका वाटते. पहाना.. तुम्ही आतापर्यंत, कोणत्या संतांनी सांगितल्या प्रमाणे जिवन जगता असे विचारा वरून वाटत नाही. तुम्ही स्वतः धर्माने सांगीत ल्याप्रमाणे आचरण करता असे वाट्त नाही, पण गप्पा अश्या की तुम्ही सर्वज्ञ आहात!