मी काही कहाण्या ऐकल्या आहेत त्यावरुन सैन्यातही भ्रष्टाचार, अंदाधुंद, वशिलेबाजी असते

खरे आहे. पण ही एक बाजू झाली. याच सैन्यात प्रखर देशभक्ती, त्याग, दुर्दम्य इच्छाशक्ती, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही कर्तव्य पार पाडण्याची जिद्द, शिस्त इ. इ. इ. देखील असते.

काही फौजी लोकांशी संबंध आला होता. ते अत्यंत उर्मट व बढाईखोर वाटले.

हेच बढाईखोर आणि उर्मट लोक रात्रंदिवस आपल्या सीमेवर पहारा देत असतात. आतंकवाद्यांचे हल्ले झेलत असतात. पूर, वादळ, अपघात, जातीय दंगली कोणत्याही प्रसंगी आपद्ग्रस्तांना मदत करत असतात.

मी सैन्यात नाही गेलो हे बरे झाले असे वाटते.

हो हे मात्र अगदी पटले.

सुरक्षिततेशी तडजोड न करता देशाच्या संरक्षण खर्चात कपात करता आली तर मला फार बरे वाटेल.

उदात्त विचार पण ही किमया कशी काय शक्य आहे हे कळले नाही. असो.