देशपांडे,
सर्वप्रथम इतक्या लंब्याचौड्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

एक स्पष्टिकरण, माझा मुद्दा सहानुभूतीचा म्हणता येऊ नये. सहानुभूती ऑफ शोर साठी रात्री बेरात्री काम करणाऱ्यांवर, इस्पितळात धावपण करणारे डॉक्टर, घर, मुलं सांभाळून काम करणारी आई सर्वांसाठीच आहे. म्हणून मला माझ्या स्नेह्यांचा किस्सा चर्चेत नको होता.

इथे फक्त एका गोष्टीची दुसरी बाजू दाखवायची आहे. ती कुसुमाग्रजांच्या कवितेतून दिसली होती.

वीररूप हे असले पाहुन पांढरपेशा श्रद्धा अमुच्या -
थिएटरातील बनावटीच्या विचलित होती.
व्यथित होऊनी परस्परांना आम्ही पुसतो,
"काय शिपाई असेच असती?" ...
होय, शिपाई असेच असती!
परंतु आम्हा उमगत नाही ते हे -
नाटकातल्या त्या शूराला नसते तेथे मरावयाचे,
असते केवळ टाळीसाठी वीरत्वाने स्फ़ुरावयाचे,

आणखी एक बाजू जी आपणच दाखवलीत,

आजच्या घडीला कनिष्ठ सेनाधिकाऱ्यांच्या हजारो जागा अर्हताप्राप्त उमेदवारांअभावी रिक्त ठेवाव्या लागत आहेत. मला म्हणायचं आहे की समाजाच्या तथाकथित उच्चभ्रू आणि विचारप्रवर्तक [opinion makers] घटकांमधे सेनादलांत जाण्याविषयी असलेली उदासीनता जर दूर झाली तर त्यांचं अनुकरण करणाऱ्या कनिष्ठ घटकांमधेही ही भावना वाढीस लागेल. आणि आजच्या कन्झ्यूमेरिझमच्या जमान्यात तेच होत नाहीये. ही जाणिव असणाऱ्यांनी स्वतःच्या घरापासून सुरुवात करावी.

इतर वेगळेपणा म्हणजे --

दुरून गप्पा मारणं फार सोपं असतं, जावे त्याच्या वंशा....

मी आणि शशांकरावांनी म्हंटल्या प्रमाणे, शिवाजी दुसऱ्याच्या घरी जन्माला यावा ही बऱ्याचजणांची इच्छा. वगैरे वगैरे, तो बहुअंशी सफल झालेला दिसतो आहे.

अमेरिकेचा Farrenheit सिनेमा पाहिलाय का? त्यातही हेच दाखवलं आहे की अमेरिकेतही पोटासाठी सैन्यात जावं लागतं म्हणून जाणारेच जास्त आहेत. ... तर भारताचं काय!

पाहिला आहे हो म्हणूनच एका प्रतिसादात विचारलय वर की किती राजकारण्यांची पोरं सैन्यात आहेत. (अंदर की बात अशी की अमेरिकेचे नाव काढल्यावर चर्चा भरकटायला नको म्हणून टाळत होते)

फार चांगला प्रतिसाद. बाकी सर्व बाबतीत सहमत

-----

शशांकराव,

 दुवा द्यायचा माहित आहे हो. पण सकाळी जरा गडबडीत होते. अभिजीत तिथे होते म्हणून त्यांना सांगितल की तुम्हीच दुवा द्या कारण मला कटायच होत. पण आम्हा दोघांची दांडी गुल. (ह. घ्या). दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.