आपल्या एकेक मुद्द्याचा व्यवस्थित समाचार घेता येईल उदा. तुम्ही म्हणजेच तुमची बहीण व मेहुणे असे तुमचे उत्तर (मला अनुभव आलेला नाही-पण माझ्या बहिणीला आला आहे! म्हणजे तुम्ही स्वतः तर ब्रम्हच दिसता!), प्रत्येक गोष्टीला जिथे तर्कशुद्ध स्पष्टीकरण देता येत नाही आणि जेथे पुराव्याची गरज आहे, तेथे तुमचे प्रयत्न कमी पडतात, तुम्ही आराधना करून बघा असे फुसके समर्थन, फोटोतल्या भुताटकीची तुमची श्रद्धा आणि चेटूक, भानामती ही अंधश्रद्धा हे आपल्याला सोयीस्कर असे तुमचे वर्गीकरण, आस्तीकतेने जगून दाखवा(म्हणजे काय करा हे तुम्हालाच माहीत!)  म्हणजे तुम्हाला प्रत्यय येईल हे बुवाबाजीचे समर्थन (याउलट आम्हीही म्हणू शकतो की तुम्ही जरा डोळे उघडून बघा म्हणजे आपल्या वर्तनातील फोलपणा आपल्याला कळून येईल!) आणि जिथे आपले मुद्दे संपतात तेथे 'देवाचा न्याय' हा व्हेटो (यात न्याय कुठे आहे असे विचारले की लगेच तुम्ही 'पूर्वसंचित', 'गतजन्मीचे पाप' असले भाकड मुद्दे काढणार!) 
सर्वज्ञाची भूमिका मी घेतलेली नाही. पण माझी भूमिका स्पष्ट नास्तीकाची आहे. 'नंतर सांगतो', 'अमेरिकेहून परत आल्यावर दाखवतो' असला वेळकाढूपणा मी केलेला नाही. अशा वादग्रस्त विषयांवर चर्चा सुरु करण्यापूर्वी आपल्याकडे आपण म्हणतो ते सिद्ध करण्यासाठी काही पुरावा आहे की नाही हा विचार न करता तो विषय मांडण्याची आततायी घाई तुम्ही केली आहे, मी नाही. आणि आपण 'चर्चा' सुरु केली आहे म्हणून या लायकी ( हा तुमचाच शब्द!) नसलेल्या विषयावर इतका काथ्याकूट!
आपली लायकी असावी लागते. (ती माझी सुद्धा नाही असेच वाटते!)
एकंदरीतच (असे वाद / चर्चा) सुरु करून त्यावर खुलेपणाने आपल्याला न पटणारी / आपल्याला गैरसोयीची असणारी मते स्वीकारण्याची तुमची लायकी नाही याच्याशी सहमत.
अवांतर - 'मनोगत' वरील लिखाणाचे शुद्धलेखन आणि व्याकरण याबाबत इतकी व्यापक चर्चा होत असताना आणि शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध असताना वाचकांना त्रासदायक असे चुकीचे लिहिण्याच्या तुमच्या अट्टाहासाचे कारण कळेल का? की तेही काही 'दैविक / अध्यात्मिक ' असल्याने आमच्यासारख्यांच्या 'लायकी' पलीकडचे आहे?